घणसोलीत बांबू डेपोला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, मोठे नुकसान

Spread the love

घणसोलीत बांबू डेपोला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, मोठे नुकसान

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : घणसोली सेक्टर १५ परिसरातील जय गणेश इमारतीजवळ असलेल्या बांबू डेपोला आज भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले. आग बांबू साठ्यात वेगाने पसरत गेल्याने परिस्थिती गंभीर बनली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon