चिंचपाड्यातील बेकायदा चाळींवर बुलडोझर; आय प्रभागाची मोठी कारवाई

Spread the love

चिंचपाड्यातील बेकायदा चाळींवर बुलडोझर; आय प्रभागाची मोठी कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण (पूर्व) : चिंचपाडा परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळींवर सोमवारी आय प्रभागाच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने मोठी कारवाई करत त्या जमीनदोस्त केल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.

सदर चाळी झाडांची कत्तल करून तसेच सरकारी, गुरचरण आणि गावठाण जमिनी बेकायदेशीररीत्या बळकावून उभारण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यानंतर संबंधित अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी सकाळपासून पथकाने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम हाती घेतली.

दरम्यान, चाळी पाडण्याच्या निर्णयाविरोधात काही तबेले मालकांनी यापूर्वी पालिका कार्यालयासमोर म्हशी आणून अनोखे आंदोलन केले होते. मात्र, प्रशासनाने आपली भूमिका कायम ठेवत कोणताही दबाव न स्वीकारता अखेर ही कारवाई पूर्ण केली.
या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणांवर लगाम बसण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon