१०० दिवसांच्या कृती आराखड्यात ठाणे पोलिसांचा ‘तक्रार निवारण दिन’; ७२३ अर्जांपैकी ४९६ तात्काळ निकाली

Spread the love

१०० दिवसांच्या कृती आराखड्यात ठाणे पोलिसांचा ‘तक्रार निवारण दिन’; ७२३ अर्जांपैकी ४९६ तात्काळ निकाली

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयात १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘तक्रार निवारण दिना’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात एकूण ७२३ अर्जदारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ५२९ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडल्या.

या कार्यक्रमात ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. अर्जदारांच्या समक्ष तक्रारींचे निवारण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

या उपक्रमादरम्यान एकूण ४९६ अर्जांची तात्काळ निर्गती करण्यात आली. उर्वरित अर्जदारांनाही लवकरच बोलावून त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तक्रारींचे जागच्या जागी निवारण होत असल्याने अर्जदारांनी समाधान व्यक्त केले असून ठाणे शहर पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon