टिळकनगरमध्ये अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक, पोलिसांकडून चौकशी

Spread the love

टिळकनगरमध्ये अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक, पोलिसांकडून चौकशी

रवि निषाद / मुंबई

मुंबई : टिळकनगर परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छेडानगर परिसरात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आपताफ आझमी याने पीडित युवतीला फूस लावून छेडानगर येथील एका लॉजमध्ये नेले. काही वेळानंतर त्याचा साथीदार अनिश चौधरी तेथे आला. दोघांनी मिळून युवतीला नशेची गोळी देऊन बेशुद्ध केल्याचा आरोप असून त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शुद्धीवर आल्यानंतर पीडित युवतीने टिळक नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा क्रमांक १३४/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ७०(२), ३५१(३) तसेच Protection of Children from Sexual Offences Act अंतर्गत कलम ४, ६, ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दोन्ही आरोपींना अटक केली.

दरम्यान, या प्रकरणाबाबत काही वेगळी माहितीही समोर येत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी आरोपी अफताफ आझमी यांनी गोवंडीतील अन्सारी कंपाउंड परिसरातील कथित अतिक्रमणाविरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे विरोधकांकडून कट रचून त्यांना या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा काही स्थानिकांकडून केला जात आहे.
मात्र या दाव्यांबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिसांकडून प्रकरणाच्या सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon