चोरीच्या आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, अल्पवयीन मुलींनं चौकशी दरम्यानच घरी संपवले जीवन; आई-वडिलांची पोलीसात धाव

Spread the love

चोरीच्या आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, अल्पवयीन मुलींनं चौकशी दरम्यानच घरी संपवले जीवन; आई-वडिलांची पोलीसात धाव

योगेश पांडे / वार्ताहर

भंडारा – जिल्ह्याच्या लाखांदूरमधील चिंचोली गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय तरुणीवर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. या चौकशीदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोपही तरुणीकडून करण्यात आला. मात्र, या आरोपानंतर संबंधित मुलीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्ववयीन मुलीच्या पालकांनी पोलिसांच्या तपासामुळेच मुलीने जीवन संपवल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी, तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती भंडाऱ्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.

ज्या अल्पवयीन मुलीवर चोरीचा आरोप लावण्यात आला, त्या अल्पवयीन मुलींनं पोलीस चौकशी दरम्यानच घरी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदुरात घडली आहे. लाखांदूरच्या चिचोली गावातील एका किराणा व्यवसायिकाने त्याच्या दुकानातून २५ हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार लाखांदूर पोलिसात केली होती. दुकानदाराने संशय व्यक्त केल्यावरुन पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेऊन २ मार्च रोजी तिची दिवसभर चौकशी केली. मात्र, या चौकशी दरम्यान पोलिसांनी जबरदस्त मारहाण केल्याचा आरोप करीत मुलींनं विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप आता तरुणीच्या आई-वडिलांनी पोलिसांवर लावला आहे.

याप्रकरणी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी माहिती देताना सांगितले की, २७ फेब्रुवारीला लाखांदुरात दाखल झालेल्या तक्रारीनंतर अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र, मुलीची चौकशी सुरू असतानाच तिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास करीत असल्याचंही सांगितलं. दरम्यान, चोरी झालेली २५ हजार रुपयांची रक्कम मुलीच्या नातेवाईकांकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नुरुल हसन यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon