समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक घटना; दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ५ वी ते ७ वीच्या चिमुकल्यांना गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक कृत्य

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक घटना; दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ५ वी ते ७ वीच्या चिमुकल्यांना गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक कृत्य

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – नाशिकच्या इगतपुरीत एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. यात अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिसांत धाव घेतलीय. इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात हा संतापजनक प्रकार घडला असून घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी इगतपुरी पोलिसांत धाव घेतलीय. इगतपुरी पोलिसांकडून मात्र फिर्याद घेण्यास टाळाटाळ सुरू असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ५ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची माहिती आहे. गुंगीचे औषध, मद्य पाजून अत्याचार केल्याचा पिडीत विद्यार्थ्यांसह पालकांचा आरोप आहे. तर व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं हे गंभीर प्रकार घडल्याचा दावा करत पालकांनी कारवाईची मागणी केली आहे. अशातच, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यामागील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon