दिवसा उघड्या घरात घुसखोरी करणारा सराईत चोर गजाआड; दोन मोबाईल चोरीचे गुन्हे उघड

Spread the love

दिवसा उघड्या घरात घुसखोरी करणारा सराईत चोर गजाआड; दोन मोबाईल चोरीचे गुन्हे उघड

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : गुन्हे शाखा, घटक १ ठाणे यांनी प्रभावी कारवाई करत मुंबईत दिवसा उघड्या घरात प्रवेश करून मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक केली आहे. या कारवाईमुळे नेहरू नगर पोलीस ठाणे हद्दीतील मोबाईल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे ९५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी दिवसा घरमालक बाहेर गेलेले असताना संधी साधून घरात प्रवेश करायचा आणि मौल्यवान मोबाईल फोन चोरी करून पसार व्हायचा. या प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गुन्हे शाखा घटक १ ठाणे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपीला अटक केली.

या यशस्वी कारवाईमुळे मुंबईतील नेहरू नगर परिसरातील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, पुढील तपास सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे शहर पोलीस सदैव तत्पर असून, अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon