मेहूणीवर लोखंडी रॉडने हल्ला; पायाचे हाड फ्रॅक्चर, दागिने लंपास

Spread the love

मेहूणीवर लोखंडी रॉडने हल्ला; पायाचे हाड फ्रॅक्चर, दागिने लंपास

पोलीस महानगर नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : बहिणीला व तिच्या मुलाला आधार दिल्याच्या रागातून बहिणीच्या पतीने मेहूणीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना देहू–आळंदी रस्ता परिसरातील मोशी येथे घडली. या हल्ल्यात पीडित महिलेच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून, आरोपीने तिचा मोबाईल फोन व मंगळसूत्रही हिसकावून नेल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील वादातून ही घटना घडली. पीडित महिलेने बहिणीला व तिच्या अल्पवयीन मुलाला मदत केल्याचा राग धरून आरोपीने तिच्यावर लोखंडी रॉडने वार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon