महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीत धक्कादायक प्रकार; गोमांस विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला जमावाकडून मारहाण

Spread the love

महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीत धक्कादायक प्रकार; गोमांस विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला
जमावाकडून मारहाण

योगेश पांडे / वार्ताहर

शिर्डी – हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीसारख्या श्रद्धास्थळी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साईनगरीत सर्वत्र भक्तीमय वातावरण असताना, काही जणांकडून विचित्र प्रकार घडवला असल्याचं समोर आलं आहे.

दुचाकीवरून चोरीछुप्या पद्धतीने गोमांस विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला संतप्त जमावाने रंगेहाथ पकडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी हे मांस तपासणीसाठी पाठवले असून याची अद्याप निश्चित माहिती कळू शकलेली नाही. त्याच्याकडे संशयास्पद मांस आढळून आल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. या घटनेत संबंधित व्यक्तीला जमावाकडून जबर मारहाण करण्यात आली. जमावाकडून त्याला अंगावरुन संपूर्ण कपडे काढण्यास भाग पाडले आणि त्याला मारहाण करण्यात आली.

हा प्रकार शिर्डी–साकुरी–शिव रस्त्यावर, भररस्त्यात घडल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी गोमांस विक्रीचा प्रयत्न हा धार्मिक भावना दुखावणारा आणि जाणीवपूर्वक केलेला प्रकार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच गोरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला पांगवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon