चेंबूर प्रभाग १५० : आरपीआय (आंबेडकर) कडून आयशा अन्सारी रिंगणात; ‘गॅस सिलिंडर’ निवडणूक चिन्ह

Spread the love

चेंबूर प्रभाग १५० : आरपीआय (आंबेडकर) कडून आयशा अन्सारी रिंगणात; ‘गॅस सिलिंडर’ निवडणूक चिन्ह

रवि निषाद / मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५० मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तर्फे आयशा जोहर अली अन्सारी यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीत त्या ‘गॅस सिलिंडर’ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

प्रभाग १५० मध्ये मुस्लिम आणि आंबेडकरी समाजाची लोकसंख्या लक्षणीय असल्याने आयशा अन्सारी यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीच्या समीकरणांमध्ये हालचाल वाढल्याचे चित्र आहे. पी. एल. लोखंडे मार्ग परिसरातील नागवाडी, कादरिया नगर, माळेकर वाडी, गुलशन बाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नुरानी बाग, जुनी नागवाडी, पंजाबी चाल, फुले नगर आदी भागांत त्यांच्याबाबत चर्चा रंगताना दिसत आहे.

आरपीआय (आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या आशीर्वादाने ही उमेदवारी मिळाल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, आयशा अन्सारी यांना मुस्लिम तसेच आंबेडकरी समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रचारात उत्साह दिसून येत आहे.

प्रभाग १५० मध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, त्यामुळे या मतदारांचा कल निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी या प्रभागातील प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon