तात्काळ तपास व अचूक माहिती संकलनाच्या आधारे कोपरी पोलिसांकडून हरवलेले मोबाईल फोन शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कोपरी पोलीस स्टेशनच्या वतीने हरवलेल्या मोबाईल फोन प्रकरणी तात्काळ तपास करत अचूक माहिती संकलनाच्या आधारे अनेक मोबाईल फोन शोधून काढण्यात यश आले आहे. शोधून काढलेले हे मोबाईल फोन संबंधित मूळ मालकांकडे यशस्वीरीत्या सुपूर्द करण्यात आले.
हरवलेल्या मोबाईल बाबत नागरिकांनी दिलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत कोपरी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तसेच तांत्रिक विश्लेषण, सीईआयआर प्रणाली व नेटवर्क ट्रॅकिंगच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अल्प कालावधीत मोबाईल फोनचा माग काढत ते हस्तगत करण्यात आले.
मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत असून, कोपरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी कोपरी पोलीस सदैव सज्ज असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.