महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई

Spread the love

महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – जिल्ह्यातील सिन्नरच्या तहसीलदारांना कालच एसीबीने रंगेहात पकडल्यानंतर गुरुवारी नाशिक महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिकास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधकाने अटक केली आहे. राजेंद्र बोरकडे असे लाचखोर लिपिकाचे नाव असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. दिव्यांग दुकान चालकाकडून ७ हजार रुपयांची लाच घेताना हा लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात अडकला. एसीबीच्या या कारवाईने नाशिक जिल्ह्यातील प्रशासनात खळबळ उडाली आहे. कारण, दोन दिवसांत दोन मोठ्या कारवाया करत अधिकारी आणि लिपिकास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाचखोर राजेंद्र बोरकडे याला महापालिकेतून थेट एसीबी च्या कार्यालयात नेण्यात आले असून तिथेच त्याची चौकशी सुरू आहे. येथील एका दिव्यांग दुकान चालकाकडून सात हजार रुपये लाच घेताना महापालिके लिपिक म्हणून कार्यरत असलेला राजेंद्र बोरकडे रंगेहात पकडला गेला. दिव्यांग दुकान चालकास गाडी सोडून देतो असे सांगत १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती सात हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ही कारवाई केली. विशेष म्हणजे लाचलुचपत विभागाकडून नाशिकमध्ये दोन दिवसात ही दुसरी मोठी कारवाई आहे. दोनच दिवसांपूर्वी सिन्नरच्या नायब तहसीलदाराला २.५ लाख लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती.

जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात सिन्नरच्या तहसीलदाराने तक्रारदाराकडे तब्बल १०लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर, तडजोडीत अडीच लाखांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीने तहसीलदार संजय धनगर यांना रंगेहात पकडले. शहरातील सोपान हॉस्पिटलसमोर ही लाच स्वीकारत असताना एबीसीने थेट धाड टाकत अटक केली. त्यानंतर, येथील मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तर, सर्वसामान्यांकडून या कारवाईचं स्वागत होत असून प्रशासनातील भ्रष्टाचार हा संतापजनक प्रकार असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon