भिवंडीतील ‘नजारा बार’ म्हणजे अश्लीलतेचा उघडं दुकान! पहाटे ५ वाजेपर्यंत व्हल्गर नाच, वरच्या मजल्यावर देहव्यापार; पोलिसांची अर्थपूर्ण शांतता!

Spread the love

भिवंडीतील ‘नजारा बार’ म्हणजे अश्लीलतेचा उघडं दुकान! पहाटे ५ वाजेपर्यंत व्हल्गर नाच, वरच्या मजल्यावर देहव्यापार; पोलिसांची अर्थपूर्ण शांतता!

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहराला बदनाम करणारा आणि समाजव्यवस्थेची थट्टा करणारा ‘नजारा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट’ सध्या अश्लील नृत्य आणि देहव्यापाराचा उघडं अड्डा बनला आहे. काप कानोरी परिसरात रात्रभर चालणाऱ्या या बारमध्ये ओरकेस्ट्राच्या नावाखाली उघडपणे व्हल्गर नाच, तर वरच्या मजल्यावर “रूम सर्व्हिस”च्या नावाखाली पैशाला स्त्रीविक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

सलवार-कुर्त्यात अश्लीलतेचा धंदा!

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलींना मुद्दाम साध्या कपड्यांत – सलवार-कुर्ता, टी-शर्ट-जीन्समध्ये – नाचायला लावले जाते. वरवर “हा डान्स बार नाही” असा दिखाऊ बचाव आणि आत मात्र अश्लीलतेचा धुमाकूळ, हेच इथं दररोजचं वास्तव आहे.

परवान्याची उघड उडवणूक

या बारला फक्त रात्री १२.३० वाजेपर्यंतच परवानगी असताना तो बिनधास्तपणे पहाटे ५ ते ५.३० वाजेपर्यंत सुरू असतो. मद्यधुंद ग्राहकांचे थवे रस्त्यावर धिंगाणा घालतात, आरडाओरडा, भांडणं, छेडछाड रोजचीच बाब झाली आहे.

एका टेबलवर २५ हजारांचा मारा!

दारू, नाच आणि “स्पेशल सर्व्हिस”च्या नावाखाली एका टेबलवर २० ते २५ हजार रुपयांचा चुराडा सहज उडवला जातो. वरच्या मजल्यावर “रूम सर्व्हिस”च्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत; मात्र प्रशासनाच्या कानावर जूं रेंगाळत नाही!

नागरिकांचा उद्रेक – ‘आमच्या मुली सुरक्षित नाहीत!’

“आमच्या मुली-बायका रात्री रस्त्यावरून चालताना घाबरतात. पहाटेपर्यंत मद्यधुंद टोळ्या धिंगाणा घालतात. आम्ही पोलिसांकडे तक्रारी केल्या, पण कारवाई शून्य! उलट काही पोलीसच इथे ये-जा करत असल्याचं आम्ही पाहतोय,” असा थेट आरोप संतप्त नागरिकांनी केला.

रेड म्हणजे दिखावा, दंड म्हणजे हप्तेखोरी?

काही वेळा पोलिस रेड टाकतात, थोडाफार दंड आकारतात आणि बार पुन्हा दुसऱ्या दिवशी दुप्पट जोमात सुरू! ही कारवाई आहे की हप्तेखोरीचा भाग, असा सवाल आता जनतेतून उघडपणे विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon