“आयएएस परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट; राज्यातील पोलीस–दंडाधिकारी समन्वयावर मार्गदर्शन”
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे भारतीय प्रशासन सेवा सन २०२४ चे परिविक्षाधीन अधिकारी दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे भेटीवर आले.
या भेटीदरम्यान मा. पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधत राज्य पातळीवरील पोलीस–प्रशासन समन्वय यंत्रणेची माहिती दिली. तसेच जिल्हा व उपजिल्हा स्तरावरील गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे, आपत्ती व्यवस्थापन, तसेच पोलीस–दंडाधिकारी यांच्यातील कार्यात्मक समन्वय कसा असावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण सत्रातून भविष्यातील प्रशासनिक नेतृत्व अधिक सक्षम व समन्वयपूर्ण पद्धतीने कार्य करेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.