मानपाडा पोलिसांकडून सायबर जनजागृती मोहीम; रिक्षाचालकांना फसवणूक टाळण्याचे मार्गदर्शन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याच्यावतीने सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या विशेष उपक्रमात रिक्षाचालकांना सायबर फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती देत, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी उपाय स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक ☎️ 1930 ची माहिती देऊन रिक्षाचालकांमध्ये जनजागृतीसाठी स्टिकर्सचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे वाहतूक क्षेत्राशी संबंधित कामगार आणि नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबद्दल सजगता निर्माण करणे, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.