५० लाखांच्या ड्रग्ज तस्करीचा मुंबईत पर्दाफाश! बारामती पोलिसांच्या कारवाईत फरार आरोपीला बेड्या

Spread the love

५० लाखांच्या ड्रग्ज तस्करीचा मुंबईत पर्दाफाश! बारामती पोलिसांच्या कारवाईत फरार आरोपीला बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

बारामती – बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल, ५० लाखांच्या एम.डी. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला अखेर गजाआड केले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळींज पोलीस ठाणे, नालासोपारा (ईस्ट), मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात दि.१४ सप्टेंबर रोजी एनडीपीएस कायदा 1954 अंतर्गत तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपी नामे शहबाज हमीद शेख, योगेश राजू राठोड, जफर आसिफ शेख, बाबू शेख आणि समीर शेख यांच्याविरुद्ध कारवाई सुरू होती. यापैकी समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (२०) हा फरार असून बारामती परिसरात असल्याची माहिती वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती. पथकाने शोधमोहीम राबवत तो बारामती शहरात वास्तव्यास असून ‘ब्रँड रिव्हर’ या कपड्याच्या दुकानात काम करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली. यानंतर, पोलिसांनी हुशारीने आखलेल्या योजनेनुसार पथकाने पाहणी करत आरोपीची ओळख पटवली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतले.

बारामती पोलिस ठाण्यात चौकशीदरम्यान त्याने तुळींज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कबूल केले. तत्काळ मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयास माहिती देऊन आरोपीस त्यांच्या ताब्यात पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स.पो.नि. विक्रम पवार, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, सुरेश बडे, आणि पोलीस अंमलदार निलेश वाकळे राहुल लांडगे यांच्या पथकाने केली.आरोपीस मीरा भाईंदर पोलीस, तुळींज पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राख, पोलीस हवालदार कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

१३ सप्टेंबरला नालासोपाराच्या सेंट्रल पार्कजवळ मिळालेल्या टीपच्या आधारे एक सापळा रचला होता. मध्यरात्रीच्या सुमारास ३ व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या कडून पोलिसांनी २५० ग्राम एम.डी. ड्रग्स जप्त केले. या ड्रग्जची बाजारात किंमत अंदाजे ५० लाख आहे. यासोबतच पोलिसांनी मोबाईल फोन आणि इतर पुरावेही जप्त केले. या प्रकरणातील पुढील तपासात पोलिसांनी बारामतीत कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon