पर्वती पोलिसांचे धडाकेबाज यश; मोका गुन्ह्यातील एक वर्षांपासून फरार आरोपी अखेर गजाआड
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पर्वती पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत मोका गुन्ह्यातील एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे पर्वती पोलिसांचे पुन्हा एकदा शौर्य आणि दक्षता अधोरेखित झाली आहे.
पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६४/२०२४ अंतर्गत, भा.दं.वि. कलम १०१(१)(ब), १२०(ब), १४३(१), १४७(४), १४८, १४९, ५०७(२) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलम ३(१)(ii), ३(२) प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील महेश मंडलिक टोळीतील एक सदस्य रघुनाथ शितोळे (वय २८, रा. कन्हेरवाडी, दत्तनगर, कात्रज, पुणे) हा आरोपी गेल्या वर्षभरापासून फरार होता.
गुन्हे शाखेतील पोलिस अमलदार महेश मंडलिक आणि सहाम शेख यांना आरोपी पुण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. तत्काळ उपनिरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. पोलिस अमलदार प्रकाश मरगणे, सहाम शेख, नागराज खाडे आणि सुरज जाधव यांच्या पथकाने कुशल सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त, सिंहगड रोड विभाग यांच्या देखरेखीखाली पार पडली असून, अटक आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
या यशस्वी कारवाईसाठी अपर पोलिस आयुक्त पश्चिम विभाग, पोलिस उपायुक्त परिमंडळ-३ श्री. संदीप कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त सिंहगड रोड विभाग आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्मिनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कार्य केले.
या मोहिमेत उपनिरीक्षक किरण पवार, अमलदार प्रकाश मरगणे, महेश मंडलिक, सहाम शेख, नागराज खाडे, सुरज जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दळवे, स्वप्नील धुंगे, मनोज बनसोडे, अमित विधे आणि किली भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. पर्वती पोलिसांच्या या कारवाईचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनीही कौतुक केले असून, फरार आरोपींविरुद्धच्या कारवाईत पर्वती पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.