उपायुक्त शंकर पाटोळे निलंबित; महापालिका आयुक्तांचा आदेश
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वाची कारवाई करत परिमंडळ-१ चे उपआयुक्त शंकर पाटोळे यांना तात्काळ निलंबित केले आहे. ही कारवाई २ ऑक्टोबरपासून प्रभावी ठरणार असून, त्याबाबतचा अधिकृत आदेश शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून आयुक्त राव यांनी पाटोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची चौकशीही सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर या प्रकरणाला गांभीर्याने घेतले जात असून, महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.