ठाणे गुन्हे शाखेची कारवाई : सराईत वाहनचोर अटकेत, दोन ऑटो रिक्षा जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : गुन्हे शाखा, घटक – १, ठाणे यांनी ऑटो रिक्षा चोरी प्रकरणातील सराईत आरोपीला ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाईत तब्बल दोन रिक्षा जप्त करून १,३१,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीस पकडले. चौकशीत त्याने रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली.
या यशस्वी कारवाईमुळे वाहनमालकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून नागरिकांनी ठाणे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.