कोनगाव पोलिसांची तत्पर कामगिरी; ७० वर्षीय बेपत्ता महिला सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
कोनगाव : गावातील ७० वर्षीय धनपती गुप्ता या महिला अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली.
पोलीस पथकाने कसून शोध घेत अखेर जंगल परिसरातून त्या महिलेला सुखरूप शोधून काढले. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
या तत्पर आणि संवेदनशील कार्याबद्दल गुप्ता कुटुंबियांनी कोनगाव पोलीस ठाण्याचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. स्थानिक नागरिकांकडूनही पोलिसांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.