मुंब्र्यात अवैध पिस्तूलसह आरोपी अटकेत; गुन्हे शाखेची धडक कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : गुन्हे शाखा घटक – १, ठाणे पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला गजाआड करत मोठी कारवाई केली आहे. रेतीबंदर रोड, मुंब्रा येथे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायदा (म.पो.का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीला अवैध शस्त्र पुरवठ्याच्या रॅकेटशी संबंधित दुवे आहेत का, याची चौकशी केली जात आहे.
गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.