स्पेशल २६’ स्टाईलने किलोभर सोनं अन् कोट्यवधी रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा छडा; मुद्देमाल हस्तगत करत तिघांना बेड्या

Spread the love

स्पेशल २६’ स्टाईलने किलोभर सोनं अन् कोट्यवधी रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा छडा; मुद्देमाल हस्तगत करत तिघांना बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

सांगली – आयकर अधिकारी असल्याचे भासवून कवठेमहांकाळ येथील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आलं आहे. या गुन्ह्यातील आतापर्यंत ३ आरोपी जेरबंद झाले असून या गुन्ह्यात एकूण ७ आरोपीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे तर पोलीस बाकी आरोपीच्या मागावर आहेत. आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ कोटी २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्यात वापरलेली गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली. दीक्षा राष्ट्रपाल भोसले (२५),पार्थ महेश मोहिते (२५) आणि साई दीपक मोहिते (२३) ही अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. महेश रघुनाथ शिंदे,अक्षय लोहार,शकील पटेल आणि आदित्य मोरे हे चौघेजण अद्याप फरार आहेत. या चौघांना पकडण्यासाठी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक मागावर आहेत.

हिंदी चित्रपटातील स्पेशल २६ सारखा हुबेहूब छापा कवठेमहांकाळमधील गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर टाकण्यात आला होता. यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि कवठेमहांकाळ पोलीस तपास करीत होते. त्यानुसार पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील एका तरुणीसह चौघांना कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतील घाटकोपर येथून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान तोतया आयकर अधिकारी असणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली असून अन्य तिघांकडे चौकशी करण्यात येत आहे. तसेच डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरातून चोरीस गेलेली रोकड आणि सर्व सोन्याचे दागिनेही तोतया अधिकाऱ्यांकडून परत मिळाले असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सांगलीमध्ये अशा प्रकारचा प्रथमच छापा पडला होता. परंतु त्याचा छडा लावण्यामध्ये मात्र आता सांगली पोलिसांना आले

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली, पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील कवठेमहांकाळ पोलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली, सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली, सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर कवठेमहांकाळ पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे सायबर पोलीस ठाणे, सांगली, पोलीस उप-निरीक्षक तेजश्री पवार ए.एच.टी.यू सांगली, पोलीस उप-निरीक्षक विनायक मासाळ कवठेमहांकाळ पोलीस ठाणे पोफौ/स्वप्ना गराडे, पोहवा / सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, सागर टिंगरे, संदीप नलावडे, अमिरशा कीर, सतिश माने, संदीप गुरव, मच्छिद्र बर्डे, उदयसिंह माळी, अनिल कोळेकर,अमर नरळे, आमसिध्दा खोत, सोमनाथ गुंडे, इम्रान मुल्ला, अतुल माने, अमोल ऐदाळे पोकों / केरूबा चव्हाण, विक्रम खोत.पोना/नागेश मासाळ, पोकों/सिध्दराम कुंभार, अभिजीत कासार, शितल जाधव, स्वप्निल पाटील, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे. पोकों / अभिजीत पाटील, अजय पाटील, अजय बेंद्रे, शांता कोळी सायबर पोलीस ठाणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon