३ इडियट्स’ फेम अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Spread the love

३ इडियट्स’ फेम अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – ३ इडियट्स’ ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे ठाण्यात वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. १९८० च्या दशकात त्यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सहायक भूमिकेतही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अच्युत पोतदार यांनी भारतीय सेना आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी केल्यानंतर वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. पोतदार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आणि डझनांहून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यांनी गोविंद निहलानी, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, सूरज बडजात्या आणि राम गोपाल वर्मा यांसारख्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले.

आक्रोश, अर्ध सत्य, तेजाब, परिंदा, राजू बन गया जेंटलमन, दिलवाले, रंगीला, मृत्युदंड, इश्क, वास्तव, हम साथ साथ हैं, परिणीता, लगे रहो मुन्ना भाई, दबंग २, थ्री इडियट्स आणि व्हेंटिलेटर यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. वागले की दुनिया’, ‘मिसेस तेंडुलकर’, ‘माझा होशील ना’ आणि ‘भारत की खोज’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधूनही त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली.

अच्युत पोतदार यांना त्यांच्या नैसर्गिक आणि प्रभावी अभिनयासाठी नेहमीच लक्षात ठेवले जाईल. ‘३ इडियट्स’मधील त्यांची छोटीशी भूमिकाही लोकांच्या मनात कायम घर करून राहिली आहे. त्यांचा डायलॉग आजही सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून वापरला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon