सायनमध्ये एमटीएनएलची केबल चोरी उघड – १४ जण अटकेत, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

सायनमध्ये एमटीएनएलची केबल चोरी उघड – १४ जण अटकेत, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पहाटेच सायन परिसरात एमटीएनएलच्या कॉपर केबल चोरी प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झाला आहे. शीव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रोड क्र. २९, डाल्डा कंपनीसमोर कारवाई करून १४ जणांना अटक केली. आरोपी जेसीबी मशीनच्या सहाय्याने डक्टमधून भूमिगत कॉपर केबल बाहेर काढत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले. अधिकृत परवानगी किंवा ओळखपत्र नसल्यामुळे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी एमटीएनएलचे व्यवस्थापक विनोद रामदास नगराळे (५३) यांनी फिर्याद नोंदवली असून शीव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०८/२०२५ कलम ३०३ (२), ३२४ (३), ६२, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये निरज विजय सराफ (३०), वेलु करुणा कुंदर (४२), दिनेश दिगंबर मोकल (३९), यश प्रविण घोरड (२५), संतोष अनंत दळवी (३८), आकाश शंकर धोतरे (२२), अमन अवधेश चौधरी (२१), विक्रम केशरी अग्रवाल (४२), संजयकुमार गौंड (२९), नितीन उमाजी गजाभरे (३०), सचिन बाबु दासर (२४), निखिल गंगाधर बाविस्कर (२३), महेश सुधाकर कुलात (२६) आणि मिराज यासीन मन्सुरी (३२) यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी एक जेसीबी मशीनसह एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य विभाग) विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-०४) रागसुधा आर., सहायक पोलीस आयुक्त (सायन विभाग) शैलेंद्र धिवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (शीव पोलीस ठाणे) अनंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक किरण भोसले यांच्यासह पोशि जाधव, पोशि पाटील, पोशि डबडे, पोशि बोरगे यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon