पालघर दांडेकर कॉलेज चोरी प्रकरण उघडकीस; गुजरातमधून चौघांना अटक

Spread the love

पालघर दांडेकर कॉलेज चोरी प्रकरण उघडकीस; गुजरातमधून चौघांना अटक

पालघर / नवीन पाटील

पालघर येथील दांडेकर कॉलेजमधील अकाउंट विभागाच्या तिजोरीतून विद्यार्थ्यांच्या फीची १ लाख २४ हजार रुपयांची रोकड चोरी प्रकरणातील चौघा आरोपींना पालघर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. आरोपींकडून ४ लाख ४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

घटना २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते २४ जुलै सकाळी ७.२५ या वेळेत घडली होती. फिर्यादी मनोज शंकर परब यांनी दिलेल्या तक्रारीवरून पालघर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५/२०२५ भा.दं.वि. कलम ३८०, ४५७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी तपास पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे उंबरगाव, गुजरात येथून चार आरोपींना अटक केली.

यात शुबम वीरेंद्र सिंग (वय २२, ट्रक चालक), मुरली मनोहर पवार (वय २३, रिक्षा चालक), अरुण लखन चव्हाण (वय १९, मिस्त्री कामगार) आणि फारस फिरोज खान (उंबरगाव, गुजरात) अशी अटक करण्यास्ट आलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी सर्व आरोपीची कठोर चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. जप्त केलेली ४,०४,००० रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पो.उप.नि. रवींद्र वानखेडे आणि गोरखनाथ राठोड तसेच पोलीस हवालदार दिनेश गायकवाड, कैलास पाटील, राकेश पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखा तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon