सराईत घरफोड्या करणारा आरोपी गजाआड; ५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ गुन्हे उघड

Spread the love

सराईत घरफोड्या करणारा आरोपी गजाआड; ५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ गुन्हे उघड

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी – नारपोली पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी संशयित आरोपीचा कसून शोध घेतला. गुन्हे शाखा घटक-२, भिवंडी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आकाश उर्फ चिन्या शशिकांत जाधव (वय २५, रा. मानपाडा, ठाणे) यास अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने भिवंडी व ठाणे परिसरात एकूण ९ घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमारे ₹५,९८,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे:

१. नारपोली पो.ठा. गु.र.नं. ८११/२०२५ – भा.न्या.सं.क. ३०५(अ), ३३१(३)
२. नारपोली पो.ठा. गु.र.नं. ८०८/२०२५ – भा.न्या.सं.क. ३०५(अ), ३३१(३)
३. नारपोली पो.ठा. गु.र.नं. ४७९/२०२५ – भा.न्या.सं.क. ३०५(अ), ३३१(३)
४. नारपोली पो.ठा. गु.र.नं. ३८०/२०२५ – भा.न्या.सं.क. ३०५(अ), ३३१(३)
५. नारपोली पो.ठा. गु.र.नं. ३५०/२०२५ – भा.न्या.सं.क. ३०५(अ), ३३१(३)
६. भिवंडी शहर पो.ठा. गु.र.नं. ११३७/२०२४ – भा.न्या.सं.क. ३०५(अ), ३३१(४)
७. निजामपुरा पो.ठा. गु.र.नं. ७४/२०२५ – भा.न्या.सं.क. ३०३(२)
८. शांतीनगर पो.ठा. गु.र.नं. ६८८/२०२५ – भा.न्या.सं.क. ३०५, ३३१(३)
९. भिवंडी शहर पो.ठा. गु.र.नं. ४५४/२०२५ – भा.न्या.सं.क. ३०३(२)

ही कामगिरी डॉ. पंजाबराव उगले (अप. पोलीस आयुक्त, गुन्हे), अमरसिंह जाधव (पो.उप.आयुक्त, गुन्हे) व शेखर बागडे (सहा. पो.आयुक्त, गुन्हे शोध-१) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि जनार्दन सोनवणे, सपोनि श्रीराज माळी, सपोनि/मिथुन भोईर, पोउपनि रविंद्र पाटील, सपोउपनि सुधाकर चौधरी, सुनिल साळुंखे, पोहवा शशिकांत यादव, प्रशांत राणे, पोशि अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, सफर्फासज तडवी, मपोहवा/माया डोंगरे यांच्या पथकाने केली.

सदर आरोपीविरोधात पुढील तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon