गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य आरोपी पुण्यातून जेरबंद

Spread the love

गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य आरोपी पुण्यातून जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

नगर – अहिल्यानगर येथे घडलेल्या गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. फिर्यादी प्रमोद रामदास घोडके यांना डोकेदुखीची गोळी आणण्यासाठी जात असताना, आरोपींनी ऋषी ढवण यांच्यासोबतच्या संबंधावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी भिमराज आव्हाड याने हातातील पिस्तुलमधून दोन राऊंड फायर केले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५९३/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती, मात्र प्रमुख आरोपी फरार होते. पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक पुणे येथे रवाना करण्यात आले.

दिनांक १५ जून रोजी केसनंद, पुणे येथे आरोपी भिमराज गेणुजी आव्हाड (वय ५८, रा. नित्यसेवा, अहिल्यानगर) व राहुल विजय सांगळे (वय ३३, रा. सावेडी, अहिल्यानगर) हे उपस्थित राहणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली. भिमराज आव्हाड याच्याविरुद्ध यापूर्वी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असून तो जामिनावर आहे. तर राहुल सांगळे याच्याविरुद्ध मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon