गुजरातमधून नाशिकमध्ये गुटख्याची तस्करी उधळली; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

गुजरातमधून नाशिकमध्ये गुटख्याची तस्करी उधळली; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क 

नाशिक – राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील गुजरातमधून नाशिकमध्ये अवैध गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने पेठरोड परिसरात सापळा रचून सुमारे ५ लाख ४५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी वाहनचालक वैभव सुनील क्षीरसागर (२५, रा. उमराळे, दिंडोरी) याला अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिस अंमलदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या पथकाने तवलीफाटा, पेठरोड परिसरात सापळा लावला. एमएच १५ एफव्ही २७५१ या क्रमांकाच्या जीपची तपासणी केली असता त्यामध्ये प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा सापडला.

आरोपीने प्राथमिक चौकशीत सांगितले की, हा गुटखा गुजरातमधील सुतारपाडा येथून नाशिकमध्ये आणला जात होता. मात्र, नाशिकमध्ये हा साठा कोणाला वितरित केला जाणार होता, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon