भुशी डॅम येथे पर्यटनासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

Spread the love

भुशी डॅम येथे पर्यटनासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – पावसाळा सुरु झाला की पर्यटन पण बहरू लागते. पर्यटनासाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांना मोह आवरत नाही आणि यातून काही भयानक घटना घडतात. अशीच एक घटना लोणावळ्यातून समोर आली आहे. भुशी डॅममध्ये पोहण्याचा मोह न आवरल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे दोन्ही पर्यटक उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती समोर आली आहे. मो. जमाल आणि साहिल असराफ अली शेख अशी दोघांची नावे आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवार असल्याने मोहम्मद जमाल आणि साहिल हे दोघे मित्रांसोबत पर्यटनासाठी लोणावळ्यातील भुशी धरणावर आले होते. पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. यामुळे सोबत असलेले सर्वजण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते धरणातील खोल पाण्यात गेले असताना बुडाले. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.

घटनेची माहिती लोणावळा पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांचे पथक आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी या कठीण परिस्थितीत अतुलनीय धैर्य दाखवले. या ऑपरेशनमध्ये महेश मसणे, सचिन गायकवाड, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू, हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, श्याम वाल्मीक, महादेव भवर आणि राजेंद्र कडू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेत पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने बचाव कार्यात अडचणी आल्या, परंतु टीमच्या समन्वय आणि निश्चयामुळे दोन्ही मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon