राज्यात हाई अलर्ट, सरकार ऍक्शन मोडमध्ये; ६ वरिष्ठ आईपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Spread the love

राज्यात हाई अलर्ट, सरकार ऍक्शन मोडमध्ये; ६ वरिष्ठ आईपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांचा बदल्यांचा धडाका लावला आहे. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे राजकीयसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच आता राज्य सरकारकडून सहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच आहे. आतापर्यंत अनेक वरिष्ठ आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकीकडे भारत आणि पाकिस्तान तणाव चिघळत असताना पुन्हा एकदा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.

राज्याच्या गृहखात्याने याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे.त्यामध्ये राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक, संचालक (नागरी संरक्षण), पोलीस महासंचालक (लोहमार्ग) यांसारख्या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या ६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेली आहे १) प्रभात कुमार – संचालक, नागरी संरक्षण ( महाराष्ट्र राज्य, मुंबई), २) प्रशांत बुरडे – पोलीस महासंचालक , लोहमार्ग,३) सुनिल रामानंद- अप्पर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग,४) राजकुमार व्हटकर – अप्पर पोलिस महासंचालक (रा. रा. पोलिस बल),५)के. एम. मल्लिकार्जुन – अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण आणि खास पथके) आणि ६)प्रवीण साळुंके – अप्पर पोलिस महासंचालक , महामार्ग सुरक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon