पुण्यात राहून पाकिस्तानवर प्रेम, भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या खादिजा शेखला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तान जिंदाबाद असं स्टेटस ठेवणं पुण्याच्या तरुणीला महागात पडलं आहे. सिंहगड कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या आणि कोंढवा परिसरात राहणाऱ्या खादिजा शेख हिच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खादिजा शेख हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. खादिजा शेख हिच्याविरोधात बीएनएसच्या १५२, १९६,१९७, २९९, ३०२ आणि ३५३ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. खादिजा शेखने तिच्या स्टेटसमध्ये पाकिस्तान जिंदाबादसोबतच भारताविरोधातही गरळ ओकली आहे.पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याचे कोणतेही पुरावे न देता भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचं खादिजा शेखने तिच्या स्टेटसमध्ये म्हणलं. सकल हिंदू समाज या एक्स हॅण्डलवरून खादिजा शेख आणि तिच्या स्टेटसचे फोटो शेअर केले गेले होते. यानंतर भाजप कार्यकर्त्या सुनैना होले यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी खादिजा शेखविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली.