ठाणे पोलीस आयुक्तालयात १०० दिवसाच्या कृती आराखडा अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात दि. ०३/०५/२०२५ (शनिवार) ते दिनांक ०४/०५/२०२५ (रविवार) रोजी १०० दिवसाच्या कृती आराखडा अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर तक्रार निवारण दिनाच्या कार्याक्रमात एकुण १७३० अर्जदारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्ष १०३१ अर्जदार सदर तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमास हजर होते. तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. तक्रार निवारण दिनाच्या संदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयातील ८२१ अर्जाची तात्काळ अर्जदारांच्या समक्ष निर्गती करण्यात आली व इतर अर्जदारांनाही बोलावून घेवून त्यांच्याही तक्रारींचे निरसन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ठाणे शहर पोलीसांनी अर्जदारांना प्रत्यक्ष बोलावून जागच्या जागी तक्रारीचे निरसन व कृती केल्याने अर्जदारांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त करून ठाणे शहर पोलीसांचे विशेष आभार मानले असल्याचे ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी सांगितले.