नवी मुंबईत शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार; आरोपी पोलीसांच्या ताब्यात ३० एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी

Spread the love

नवी मुंबईत शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार; आरोपी पोलीसांच्या ताब्यात ३० एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबईतील नेरूळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूरमधील घटनेनंतर पुन्हा एकदा चिमुकल्यांचा सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ४ वर्षीय चिमुकला नेहमी प्रमाणे शाळेतून घरी परतला. त्याचा डोळ्यात पाणी असल्याने आईने त्याला विचारल्यावर त्याने जे काही सांगितलं त्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. मिळालेल्या माहितीनुसार त्या चिमुकल्याने सांगितलं की, त्याचा प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी शाळेतून घरी परतल्यानंतर मुलाने त्याच्या गुप्तांगात वेदना असल्याची तक्रार केली. पुढे विचारले असता त्याने ‘बस अंकल’ असा उल्लेख केला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही बदलापूरमध्ये एका सफाई कामगाराने दोन पूर्व-प्राथमिक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती, ज्यामुळे एकच संतापाची लाट उसळली होती. शाळेतून परतल्यानंतर मुलाने त्याच्या समस्यांबद्दल तक्रार करायला सुरुवात केली तेव्हा नेरुळची ही घटनाही उघडकीस आली. असं म्हटलं जातंय की मुलाला त्याच्या खाजगी भागात वेदना होत होत्या. आरोपीने मुलावर पेन्सिलसारखी कोणतीही वस्तू वापरली का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

या धक्कादायक प्रकरणात नवी मुंबईतील नेरुळ भागात गुरुवारी रात्री एका स्कूल बस चालकाला चार वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या घटनेबाबत पालक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये संताप आहे. सोमवारी सकाळी शाळेबाहेर निदर्शने करण्याची योजना रहिवाशांनी आखली असल्याचं माहिती मिळते आहे. दरम्यान एनआरआय कोस्टल पोलिसांनी आरोपी सुजीत दास (२५) याला अटक केली आहे. त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, २०१२ (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon