१० कोटींच्या चरसासह दोन तरुणांना केली अटक; चुनाभट्टी पोलिसांची कारवाई

Spread the love

१० कोटींच्या चरसासह दोन तरुणांना केली अटक; चुनाभट्टी पोलिसांची कारवाई

रवि निषाद/मुंबई

मुंबई – चेंबूर परिमंडळ ६ च्या अंतर्गत येणाऱ्या चुनाभट्टी पोलिसांनी ड्रग्स माफिया टोळीतील सहभागी असलेल्या दोन तरुणांना अटक करुन जवळपास १० कोटीचा चरस हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव रहीम मजीद शेख ३० वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

परिमंडळ – ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगतले की, चुनाभट्टी पोलीस एटीसी गस्त करीत असताना त्यावेळी एक तरुण संशयितरित्या वावरताना आढळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. सदर इसमाचे रहीम मजीद शेख ३० वर्ष असून तो डुंगरी लिंक रोड वलसाड गुजरातमध्ये राहावयास होता. त्याची अंगझड़ती घेतली असता त्याच्याकड़े १ किलो ९०७ ग्राम चरस आढळून आले. सदर चरसची कीमत १ कोटी ९० लाख रुपए सांगण्यात येत आहे. सदर आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा क्रमांक २१९/२०२५ कलम ८(क),२०(बी),२(सी) एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याबाब पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपीने सांगितले की, त्याच्याकडे अजुनही चरस वलसाड इथे त्याच्यामूळगावी आहे. त्याच्या सांगण्यावरून चुनाभट्टी पोलिस गुजरात इथे त्याच्या मूळगावी जाऊन तिथे नितिन शांतिलाल तंडेल ३२ वर्ष याला अटक करुन त्याच कडून ८ किलो १४६ ग्राम चरस हस्तगत करण्यात आला. एकूण १० किलो ५३ ग्राम चरस हस्तगत करण्यात आला असून त्याची बाजारात कीमत एकूण १० कोटी ५३ हजार असल्याची सांगण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त ढवळे यांनी सांगितले की, या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू ठुबल, एपीआई मैत्रानंद खंदारे,पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन ढोबले, पोलीस शिपाही नितेश विचारे, सतीश शेलकंदे, अमोल सरड़े, अमोल यमगर, राउत, सानप आणि मालवेचे पथक सामील होते. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अपर पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटिल आणि डैशिंग पोलिस उपायुक्त श्री नवनाथ ढवळे यांनी चुनाभट्टी पोलिसांचे कौतुक केके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon