२२ कोटींचं कोकेन जप्त, दोन परदेशी नागरीकांसह एक भारतीय महिला अटकेत, काशिमीरा पोलीसांची दमदार कारवाई

Spread the love

२२ कोटींचं कोकेन जप्त, दोन परदेशी नागरीकांसह एक भारतीय महिला अटकेत, काशिमीरा पोलीसांची दमदार कारवाई

मिरारोड – काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-१ ने अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत २२.३३ कोटी रुपये किमतीचं कोकेन आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या कारवाईत दोन परदेशी नागरीक आणि एक भारतीय महिला अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. दि. १५ एप्रिल २०२५ रोजी काशिमीरा गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सबीना शेख (वय ४२, रा. मोतीलाल नगर, भाईंदर पूर्व) हिच्याकडे कोकेन असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. छाप्यात तिच्याकडून ११ किलो ८३० ग्रॅम कोकेन (किंमत रु. १७.७४ कोटी) आणि ८०,०००/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

पोलिस तपासात या कोकेनचा पुरवठा नायजेरियन नागरिक अँडी उबाबुडिके ओन्यिन्से (वय ४५, रा. मिरा रोड पूर्व) याच्याकडून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यालाही अटक करण्यात आली असून त्याच्याकडून २ किलो ६०४ ग्रॅम कोकेन (किंमत रु. ३.९० कोटी) व १.०४ लाखांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. यानंतरच्या तपासात अँडी हा कोकेन कॅमेरुनची महिला क्रिस्टेबेल एन्जेई (वय ३२, रा. वसई पूर्व) हिच्याकडून घेत असल्याचं समोर आलं. क्रिस्टेबेल एन्जेई हिला अटक करून तिच्याकडून ४३३ ग्रॅम कोकेन (किंमत रु. ६४.९८ लाख), १ लाख रुपये रोख व परकीय चलन देखील जप्त करण्यात आले आहे.

सदर मोठी कारवाई काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून, अंमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळालं आहे. यशस्वी कामगिरी मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, भास्कर लांडगे, पुष्पेद्र थापा, पोलीस हवालदार अश्विन आसवले यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनिरी. उमेश भागवत गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा करीत आहेत तसेच पुकळे, सहा. पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पो. उप-निरी. उमेश भागवत, पो. उप-निरी संदीप शिंदे, सहा.पो. उप निरी. अशोक पाटील, अविनाश गर्ज पाटील, सुधीर खोत, सचिन हुले, यो मत विसपुते, धिरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे तसेच महिला सहा. फौज / दिपाली जाधव, स. फौज संतोष चव्हाण (सायबर गुन्हे शाखा,) मसुब किरण आसवले यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनिरी. उमेश भागवत गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon