मोबाईल चोरी प्रकरण उघडकीस; अँटॉप हिल पोलिसांची यशस्वी कारवाई

Spread the love

मोबाईल चोरी प्रकरण उघडकीस; अँटॉप हिल पोलिसांची यशस्वी कारवाई

मुंबई – अँटॉप हिल परिसरात घडलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. दि. १३ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी श्री. शैलेश म्हाबदी यांच्या घरातून दोन मोबाईल चोरीला गेले होते. फिर्यादीने तक्रार दाखल केल्यानंतर (गु.र.क्र. १३४/२०२५ कलम ३८० भा.दं.वि.) पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. संशयित सुफियान असाब साखरकर उर्फ सुफियान बाटला (वय २७) याला अँटॉप हिल पोस्ट ऑफिससमोर ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून लावा कंपनीचे ३ मोबाईल (रु. २,५००/-), विवो वाय २२ मोबाईल (रु. ५,०००/-) हस्तगत करण्यात आले. आरोपीवर एनडीपीएस अंतर्गत चोरी, घरफोडी आणि मारहाणीचे सहा गुन्हे नोंद आहेत. गुन्ह्याचा तपासकस.पो.नि. शिवाजी मदने करीत आहेत.

व.पो.नि. सुधाकर ढाणे व पो.नि. समीर कांबळे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, पोलीस हवालदार घुगे, पोलीस हवालदार आंधळे, पोलीस शिपाई विसपुते, पोलीस शिपाई सजगणे या सर्व अधिकाऱ्यांनी टीमवर्कद्वारे परिश्रम घेऊन गुन्हा उघडकीस आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon