वाराणसीच्या नराधमांच्या मोबाईलमध्ये ५४६ मुलींचे MMS, महाराष्ट्र कनेक्शन आले समोर.

Spread the love

वाराणसीच्या नराधमांच्या मोबाईलमध्ये ५४६ मुलींचे MMS, महाराष्ट्र कनेक्शन आले समोर.

योगेश पांडे – वार्ताहर 

वाराणसी – वाराणसीमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळताच चौकशीतून मोठं सेक्स रॅकेट समोर आले आहे. अत्याचार प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. आरोपींच्या मोबाइलमध्ये ५४६ मुलींचे नग्न व अश्लील व्हिडीओ आढळून आले आहेत. या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शनही समोर आले आहे.

वाराणसीमध्ये २३ नराधमांनी एका १९ वर्षीया तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. नराधमांनी अत्याचाराचे व्हिडीओ काढल्याची माहिती समोर आली. ही घटना उघडकीस येताच मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सेक्स रॅकेटकडे वळला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या २३ पैकी १२ मुलांचे मोबाईल फोन तपासले तेव्हा त्यांना 2-4 नाही तर ५४६ मुलींचे नग्न व्हिडिओ आणि फोटो आढळले.

आरोपींनी ज्या मोबाइलवर हे व्हिडीओ शेअर केले आहेत, त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशसह सहा राज्यांमध्ये आढळून आले आहे. या घटनेतील प्रमुख सूत्रधार व कांटिनेटल कॅफेचा मालक अनमोल गुप्ता हा उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल व तामिळनाडूत मुली पाठवत होता.

अनमोल गुप्ताच्या आयफोनमध्येही मुलींचे अश्लील व्हिडीओ आढळून आले. यातील बहुतांश व्हिडीओ कांटिनेटल कॅफेमध्ये बनवण्यात आल्याची माहिती समोर आली.

अनमोलने पोलिसांना चौकशीत सांगितले की त्याचे वडील शरद गुप्ता देखील सेक्स रॅकेटचा भाग आहेत. २०२२ मध्ये अनमोलला त्याचे वडील शरद गुप्ता यांच्यासह सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. वाराणसी अत्याचार प्रकरणातील आरोपी हे अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे.

२९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान पीडितेवर २३ पुरूषांनी अनेक ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. पीडित १९ वर्षीय तरुणीला अमली पदार्थ देत अत्याचार करण्यात आला. पीडितेच्या कुटुंबाने ६ एप्रिल रोजी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon