अल्पवयीन विद्यार्थ्याचे नग्न छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय शिक्षकाला बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अल्पवयीन विद्यार्थ्याचे नग्न छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खासगी शिकवणी शिक्षकाला घाटकोपर पोलिसांनी रविवारी अटक केली असून आरोपीने तक्रारदाराला लाथा-बुक्क्याने मारहाण केल्याचा आरोपही तक्रारी करण्यात आला आहे. याबाबत घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.तक्रारदार १६ वर्षीय विद्यार्थी आहे. तो घाटकोपर परिसरात राहणाऱ्या आरोपीकडे शिकवणीसाठी जायचा. तक्रारीनुसार, गेल्या एका वर्षापासून आरोपी शिक्षक त्याचे शोषण करत होता. आरोपीने शिकवणीसाठी व अभ्यासाच्या बहाण्याने पीडित मुलाला घरी बोलावले. त्यानंतर त्याच्यासह अश्लील कृत्य करून पीडित मुलाने मोबाईलमध्ये नग्न छायाचित्र काढले. तेव्हापासून तो पीडित मुलाला छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. गेल्या एका वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपीला विरोध केला असता त्याने लाथाबुक्क्याने तक्रारदाराला मारहाणही केली. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर १६ वर्षीय विद्यार्थ्याने याप्रकरणी घाटकोपर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ४, ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
आरोपी अभ्यास घेण्याच्या बहाण्याने गेल्यावर्षी ५ फेब्रुवारीपासून तक्रारदार मुलाला त्याच्या घरी बोलवत असे. अभ्यासाच्या बहाण्याने तो पीडित मुलाला त्याच्या घरीच झोपायला बोलवायचा. नेहमीच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने शनिवारी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून एक पथक आरोपीच्या राहत्या घरी पाठवले. त्यांनी तेथून आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी रविवारी पहाटे आरोेपीला अटक करण्यात आली.