भाजपचा संकटमोचक संकटात ! गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध, एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप

Spread the love

भाजपचा संकटमोचक संकटात !
गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध, एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अशातच ‘गगनभेदी’चे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकनाख खडसे यांनी मोठे विधान केले आहे. महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संंबध असल्याचा खळबळजनक दावा केला गेला आहे. त्यासोबतच यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांना भेटून यासदंर्भाच विचारणा करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

“गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’ गिरीश महाजन यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहे. त्या महिलेचे नाव देखील मला माहित आहे मात्र ते नाव सांगणे उचित होणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अमित शहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होते. “अमित शहा यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले की तुझे एका महिला आयएस अधिकारासोबत संबंध आहे परंतु महाजन यांनी त्यांना सांगितले की नाही माझे कामानिमित्त बरेचसे अधिकाऱ्यांचे बोलले सुरू असते पण शहा यांनी त्यांना सांगितले की, तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेले आहेत तुझे एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध सीडीआर खर बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले”, असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे सिडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शहांना भेटून सांगणार आहे आणि अमित शहा आणि माझी भेट होतच राहते त्यावेळी मी त्यांना विचारणार आहे की, हे खाली जे चाललं आहे ते काय आहे, असं खडसे म्हणाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा टॉप खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आलेला बघायला मिळत आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या आरोपांमुळे भाजपचा संकटमोचकच संकटात सापडला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon