नागपूर राड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर, उचललं महत्त्वाच पाऊल

Spread the love

नागपूर राड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर, उचललं महत्त्वाच पाऊल

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन आठवड्याच्या सुरुवातीला नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. नागपूरच्या महाल भागात हा राडा झाला होता. यामध्ये वाहन फोडण्यात आली, वाहनांना आगी लावण्यात आल्या. जाळपोळ, हिंसाचार झाला. पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले. नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आहेत. मुंबईत एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ माफखान नगर परिसरात आणि संवेदनशील भागात मॉकड्रिल आणि रूट मार्च काढण्यात आला. रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगल विरोधी पथकाकडून मॉकड्रील करण्यात आलं. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांकडून संवेदनशील भाग मरोळ मापखान परिसरात हे मॉकड्रील पार पडलं.

या मॉकड्रिल मध्ये अंधेरी आणि एमआयडीसी पोलिसांचे जवळपास ६० ते ७० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोबत अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. यावेळी हिंसाचार घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहचून परिस्थितीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवतात, मॉकड्रिलच्या माध्यमातून पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon