चालकानेच चौघांना जाळून मारलं ! हिंजेवाडीतील जळीत कांडात भयंकर ट्वीस्ट; कट रचून संपवलं

Spread the love

चालकानेच चौघांना जाळून मारलं ! हिंजेवाडीतील जळीत कांडात भयंकर ट्वीस्ट; कट रचून संपवलं

योगेश पांडे / वार्ताहर

 

पुणे – हिंजवडीमध्ये एका धावत्या मिनी बसने पेट घेतल्याची घटना घडली होती. या भयंकर दुर्घटनेत व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुरुवातीला हा अपघात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट आला असून गाडीच्या चालकानेच वाहनांमध्ये आग लावून चौघांचा जीव घेतल्याचे उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आहे. पुण्यातील हिंजवडी भागात कार्यालय असलेल्या योगा ग्राफिक्स अँड प्रिटिंग कंपनीच्या कामगारांच्या गाडीला आग लागून चौघांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा दावा केला होता. मात्र ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकाने गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळं चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी अन पाच जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामगारांच्या हत्येचा गाडीच्या चालकानेच कट रचला होता. गाडीचा चालक जनार्धन हंबर्डे याने या भयंकर कट रचून या सर्वांना संपवले. जनार्धन हंबार्डे याने आधीच गाडीमध्ये एक लीटर बेन्झिन सोल्युशन केमिकल आणून ठेवले होते. त्यासोबत त्याने कापड्याच्या चिंध्या आणि काडीपेटीही आधीच ठेवली होती. गाडीच्या तपासामध्ये कुठेही शॉर्टसक्रिट झाल्याचे समोर आले नव्हते तसेच पोलिस तपासामध्ये ड्रायव्हर सीटखाली काडीपेटी आढळल्याने पोलिसांना संशय आला आणि यावरुनच तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. हिंजवडीमध्ये आल्यानंतर तमन्ना सर्कल जवळच्या उतारावर त्याने गाडीला आग लागली आणि उडी मारली. आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, त्या गाडी चालकाचा कंपनीमध्ये असलेल्या इतर कामगारांशी वाद होता. तो रोज ज्यांना घेऊन जात होता त्यांच्यावरही त्याचा रोष होता. तसेच त्याला दिवाळीचा बोनस दिला नव्हता आणि ड्रायव्हिंगव्यतिरिक्त त्याला मजुरीची कामे सांगितली जात होती. याच रागातून त्याने कंपनीमध्ये मोठा कांड करायचा असे निश्चित केले होते. त्यानुसारच हे भयंकर हत्याकांड घडवून आणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon