सायन कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प; आमदार तामिळ सेलवन यांच्या हस्तक्षेपामुळे सभासदांना थकीत भाडे देण्यास सुरुवात
मुंबई – सायन कोळीवाडा येथील इंदिरानगर हटमेंट २९०/डी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी गेल्या ३१ वर्षांपासून त्यांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत आहेत. इतक्या वर्षांच्या विलंबानंतरही अनेक कुटुंबे बिल्डरकडून त्यांचे थकीत भाडे मिळण्याची वाट पाहत होती. नाराज रहिवाशांनी भाजप आमदार तामिळ सेलवन यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तात्काळ हा मुद्दा झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालय आणि सीईओसमोर मांडला. सीईओंनी बिल्डरला इशारा दिला की जर त्याने थकीत भाडे त्वरित अदा केले नाही, तर त्याच्यावर कलम १३(२) अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.यानंतर, बिल्डर हा आमदार तामिळ सेलवन यांच्या कार्यालयात आला आणि १५ रहिवाशांना भाड्याचे चेक दिले. तसेच उर्वरित रहिवाशांचे पैसे दोन दिवसांत देण्याचे आश्वासन दिले.दीर्घ प्रतीक्षेनंतर रहिवाशांना अखेर त्यांचे थकीत भाडे मिळाले, त्यामुळे त्यांनी आमदार तामिळ सेलवन यांचे मनःपूर्वक आभार मानले.