सहकारी संस्थांचे उपनिबंधक व कार्यालय अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

सहकारी संस्थांचे उपनिबंधक व कार्यालय अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क

मालवण – शासकीय विभागातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाच लुचपत विभाग सक्रिय आहे. मंगळवारी या विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण पवार यांनी लावलेल्या सापळ्यात सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात सापडले. सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक वर्ग १ माणिक भानुदास सांगळे वय ५६ व कार्यालय अधीक्षक वर्ग३ उर्मिला महादेव यादव या दोघांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. त्यामुळे सहकारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी कामी यातील तक्रारदार यांचे श्री. स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादीत, रेवतळे, मालवण, जि. सिंधुदुर्ग या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करुन जमीन संस्थेच्या नावे करणेकरिता रुपये ५० हजार रकमेच्या लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार दि.१० जानेवारी रोजी प्राप्त झाली होती. दि. १६ जानेवारी रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेविका श्रीमती उर्मिला यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये ४० हजार लाचेची रक्कम मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या दुसऱ्या पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपी लोकसेवक माणिक सांगळे यांनी तक्रारदार यांचेकडे रुपये ३३ हजार लाच मागणी केली तसेच आरोपी लोकसेविका श्रीमती उर्मिला यादव ह्या तक्रारदार यांचेकडे लाचमागणी करीत असताना आरोपी लोकसेवक माणिक सांगळे यांनी तेथे हजर राहून लाच मागणीस प्रोत्साहन दिले. आरोपी लोकसेविका दोन यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली लाचेची रक्कम रुपये ३३ हजार पंच साक्षीदार यांचे समक्ष तक्रारदार यांचेकडून स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon