पोलिसांच्या नशामुक्ती अभियानात सहभागी झालेत अपर पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त
रवि निषाद/मुंबई
मुंबई – पूर्व प्रादेशिक विभागात असलेल्या सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या नशामुक्ति अभियान आता जोरात सुरू आहे. त्यात देवनार पोलिसांनी आयोजित केलेल्या नशामुक्ति कार्यक्रमात अप्पर पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटील आणि परिमंडल ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे हे ही सहभागी झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसात देवनार पोलिसांनी एकूण ९४ किलो २७४ ग्राम गांजा पकडून नशेखोरांची कंबर तोडली आहे. पोलिसांनी गोवंडीच्या मैजेस्टिक बिझनेस पार्क मधील वेंकट हॉलमध्ये नशामुक्ति अभियानाअंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अप्पर पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटील, परिमंडल ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोनावणे आणि देवनार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.ए.सैय्यद, शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सह इतर अधिकारी आणि कर्मचारी तसेच या परिसरातील अनेक मान्यवर, मौलाना काही मुहल्ला कमिटीचे पदाधिकारी इतर सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील आणि उपायुक्त ढवळे यांनी या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. काही मान्यवर मौलाना आणि मुहल्ला कमिटीचे पदाधिकारी यानी ही आपले मत व्यक्त केले. असे सांगण्यात येत आहे की, या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जनजागृती अभियान ही सुरु केलं गेलं आहे. ज्याचे सर्वानी स्वागत केले आहे.