अमरावतीत माणुसकीला ओशाळली !

Spread the love

अमरावतीत माणुसकीला ओशाळली !

चोरी व जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय आदिवासी वृद्धेचा छळ; वृद्ध महिलेला मानवी लघवी पाजत चपलीचा हार आणि गरम सळाखीचे चटके देत काढली धिंड

योगेश पांडे/वार्ताहर 

अमरावती – अमरावतीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. चोरी व जादूटोण्याच्या संशयावरून एका ७७ वर्षीय आदिवासी वृद्धेचा छळ केल्याचा प्रकार घडला आहे. वृद्ध महिलेला कुत्रा, मानवी लघवी पाजले, चपलीचा हार घातला, मारहाण केली, गरम सळाखीचे चटके देऊन धिंड काढली. संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. चिखलदरा ग्रामीण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील होत आहे. अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी यावर बोलताना म्हटलं की, “या प्रकरणात पोलिसांचा दुर्लक्ष झालं हे मान्य करतो. चौकशीअंती पोलीस जर दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करू. पोलीस पाटील देखील या प्रकरणात सहभागी असून तो गावाचा माजी सरपंच देखील आहे. तर अंधश्रद्धा निर्मुलन कायदा व कठोर गुन्हे या प्रकरणात दाखल करू, कोणालाही सोडणार नाही. अद्याप आरोपी अटकेत नाहीत मात्र लवकरात आरोपीला अटक करू.”

वृद्ध महिलेवर अत्याचार होत असताना संपूर्ण गाव बघत होतं. परंतु कोणीही धाडस करुन पुढे आलं नाही आणि घडत असलेला प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. या अघोरी प्रकाराने मेळघाटातील अंधश्रद्धा केव्हा दूर होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. अंगावर चटके दिल्याने महिलेला मोठी शारीरिक इजा झाली आहे. एवढी संतापजनक घटना घडूनही पोलिसांनी यावर दुर्लक्ष केल्याने अमरावती ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस आता गंभीर झाले आहे. आरोपींवर कडक कारवाईचा इशारा पोलीस जिल्हा प्रमुखांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon