दुहेरी हत्याकांडाने बीड पुन्हा हादरलं! तीन सख्खा भावांवर रॉडने वार; दोघांचा जागीच मृत्यु तर तिसरा गंभीर, ७ जणांना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
बीड – बीड जिल्ह्यात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नसून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतांना आता दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. तर तिसरा भाऊ गंभीर जखमी आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना आष्टी तालुक्यात वाहिरा गावात घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. ही हत्या का करण्यात आली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार अजय विलास भोसले, भरत विलास भोसले असं हत्या झालेल्या भावाची नवे आहेत. तर कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली. आदिवासी पारधी समाजातील जमावाने या भावांवर हल्ला करत त्यांची केली.
आदिवासी पारधी समाजातील तीन सख्खा भावांवर त्याच समाजातील एका जमावाने लोंखडी रॉड व धारदार शस्त्राने हल्ला केला. हे तिघे भाऊ आष्टी तालुक्यातील हातोळण येथील रहिवासी आहेत. हे तिघे भाऊ वाहिरा येथे काल रात्री आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील काही नागरिक देखील आले होते. गुरुवारी रात्रीपासून सर्व जण या गावी होते. रात्री ९ ते १० च्या सुमारास काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड व धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत अजय विलास भोसले, भरत विलास भोसले हे गंभीर जखमी झाले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले यातून बचवला असला तरी तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने अहिल्यानगर येथील एका दवाखान्यात भरती केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत ७ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर जमावाने का हल्ला केला याचे कारण समजू शकले नाही.