अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या रिक्षावाल्याची नागरिकांनी काढली धिंड

Spread the love

अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या रिक्षावाल्याची नागरिकांनी काढली धिंड

योगेश पांडे/वार्ताहर 

भाईंदर – अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या एका रिक्षावाल्याला नागरिकांनी चोप देऊन धिंड काढली. ही घटना मिरा रोडच्या काशिमिरा परिसरात घडली. पीडित मुलगी १२ वर्षांची असून मिरा रोड परिसरात राहते. राजू वर्मा (३८) नावाचा रिक्षाचालक तिला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. मुलगी कामानिमित्ताने घराबाहेर गेली होती. त्यावेळी राजूने अश्लील इशारे करत तिला सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी खुणावले. मुलीने लगेचच तेथून पळ काढला आणि घरी येऊन हा प्रकार सांगितला. या भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते अजय साळवी यांनी रिक्षावाल्याला रंगेहाथ पकडण्यासाठी पीडित मुलीला पुन्हा त्याच रस्त्याने जाण्यास सांगितले आणि सापळा लावला. मुलीला परत आलेलं पाहून रिक्षाचालकाने पुन्हा अश्लील इशारा केला. ते पाहून उपस्थित नागरिकांना त्याला रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला आणि अर्धनग्न धिंड काढत काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले. या मारहाणीची चित्रफित सध्या व्हायरल झाली आहे.

काशिमिरा पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक राजू वर्मा याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ (२) तसेच बालकांचे लैंगिक अत्यारापासून संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. आम्ही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालूतुरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon