आरोग्य व्यवस्थेच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह?
पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये पुन्हा एकदा प्रसूती दरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू
योगेश पांडे/वार्ताहर
पालघर – पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये पुन्हा एकदा प्रसूती दरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोखाडाव डहाणू तालुक्यातील घटना ताज्या असतानाच ही घटना आहे. यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. जव्हारमध्ये एका महिलेचा प्रसूतीवेळी तिच्या बाळासह मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दुख:द घटना आहे. कुंता वैभव पडवले असे या मृत महिलेचे नाव आहे. कुंता या ३१ वर्षीय होत्या. गर्भवती मातेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने जव्हार, मोखाड्यात बालमृत्यू आणि माता मृत्यूच्या घटनेने पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात आहे .जव्हार मोखाड्यातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार आणि सोयी सुविधांचा अभाव मातेसह बाळाच्या जीवावर बेतला असून जव्हार मोखाडयातील आरोग्य व्यवस्थेचा धीसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे .या घटनेने परिसरातून आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढले जात आहेत.प्रसूतीवेळी अशाप्रकारे महिलांचे जीव जाणे ही गंभीर गोष्ट आहे. याची दखल संबंधित आरोग्य विभागातील वरिष्ठांनी घ्यायला हवी.