दिशा महिला मंच आणि कामोठे पोलिसांकडून सायबर क्राईम विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

Spread the love

दिशा महिला मंच आणि कामोठे पोलिसांकडून सायबर क्राईम विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

रवि निषाद/प्रतिनिधि

मुंबई – दिशा महिला सामाजिक संस्था व कामोठे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा व कॉलेज मधील विद्यार्थ्यांकरिता “मोबाईलच्या विळख्यात अडकलेली तरुणाई व सायबर क्राईम” तसेच मुलींवरील अत्याचार व घ्यावयाची खबरदारी या विषयावर सत्र आयोजित केले होते. या सत्रात सोशल मीडियाच्या वापराविषयी जागरूकता, मोबाइलचा गैरवापर व त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा दुष्परिणाम व प्रभाव, सायबर सुरक्षा, सायबर गुन्हा व प्रकार, मानसिक आरोग्य जागरूकता अभियान, मुलींच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या मार्गदर्शक सूचना तसेच शारीरिक बदलामुळे होणारे परिणाम यासारख्या विविध विषयांचा समावेश करण्यात आला. या सत्रात सोशल मीडिया च्या गैरवापरामुळे सायबर गुन्हेगारी किंवा सायबर जागरूकता या विद्यार्थामध्ये कशी पसरवली जाऊ शकते, याबाबत विविध उदाहरणे देऊन जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून ते आगामी भविष्यात एक चांगले आणि जबाबदार नागरिक बनू शकतील यासाठी आयोजन करण्यात आले. सकारात्मक प्रतिसादात एकंदरीत हे सत्र अतिशय यशस्वीरीत्या संपन्न झाले. रामशेठ ठाकूर स्कूल व जुनिअर कॉलेज कामोठे तसेच स्व.दि.बा.पाटील स्कूल येथे या सत्राची ची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामोठे विमल बिडवे मॅडम, वशिष्ट कागणे पोलीस उपनिरीक्षक, युवा व्याख्याते ऍड विवेक भोपी व डॉ.कल्याणी पात्रा यांनी उत्तम मार्गदर्शन केले. यावेळी दिशा महिला मंचची संस्थापक अध्यक्षा डैशिंग लेडी सौ निलम आंधळे, सौ.विद्या मोहिते तसेच पोलीस हवालदार दिगंबर होडगे शाळेच्या प्राचार्य सौ.स्वप्नाली म्हात्रे व सहसंचालक सारिका लांजूडकर यावेळी उपस्थित होते. असे शिबीर राबवण्यासाठी ऍड सिद्धार्थ इंगळे, नाना पडाळकर, निषद राऊत, पंकज सूर्यवंशी, डॉ साक्षी सचदेव, डॉ सुवर्णा चोपडे यांच्या मार्गदर्शनाने इतरही शाळेत असे जनजागृती चे शिबीर राबवले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon