चेंबूर पोलिस स्टेशनचे राजेंद्र घोरपडे बनले सहाय्यक उपनिरीक्षक, पोलीस उपायुक्तांकडून कौतुक
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले दक्ष पुलिस कर्मचारी यांच्या विशेष योगदानामुळे त्यांना बढती देण्यात आली आहे. ते गुरुवारपासून सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असतील अशी माहिती परिमंडळ – ६ चे डैशिंग पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यानी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर पोलीस स्टेशन नंतर गोवंडी आणि आता पुन्हा चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले राजेंद्र घोरपडे हे आपल्या कामामुळे या परिमंडळमध्ये बहुचर्चित म्हणून ओळखले जातात. ते पोलिस सेवेबरोबर एक नामवंत समाजसेवक म्हणून ओळखले जातात. घोरपडे हे वेळोवेळी आपल्या राहत्या परिसरात समाजसेवा करीत असतात आणि पोलिस स्टेशनमध्ये सदैव तत्पर राहून काम करतात. त्यांच्या विशेष कामगिरी मुळे त्यांना लवकर बढती मिळाल्याचे समजते. दिनांक ०२/०१/२०२५ रोजी राजेंद्र घोरपडे यांना पोलिस उपायुक्त ढवळत यानी त्यांच्या वर्दीला स्टार लाऊन त्यांना सम्मानित करुन घोरपडे यांचे कौतुक केले आहे. घोरपडे यांच्या मित्र परिवाराने व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.